BEED24

आनंदाची बातमी … मिळाली कोरोनावर अँटी व्हायरल गोळीला मंजुरी.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दि.5 नोव्हेंबर – कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रभाव कमी करणाऱ्या जगातील पहिल्या अँटी व्हायरल गोळीला आपत्कालीन वापराची मंजुरी इंग्लंडने दिली आहे. यामुळे भविष्यात या गोळीचा वापर जगभर होवून कोरोना प्रतिबंधक लसीपासून (Corona vaccine) सुटका मिळण्याची शक्यता आहे.

(The good news is … the anti-viral pill on Corona has been approved.)

इंग्लंडमध्ये मंजूरी देण्यात आलेल्या या गोळीचे नाव मोल्नुपिराविर आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे ज्या रुग्णांमध्ये आढळतील त्यांना दिवसातून दोन वेळा ही गोळी घ्यावी लागणार आहे. या गोळीमुळे कोरोनाचा प्रभाव लवकर कमी होईल आणि तब्येत सुधारण्याचा वेग वाढणार आहे.

इंग्लंड (England) वगळता जगातील कोणत्याही देशाने अद्याप कोरोनाचा प्रभाव कमी करणाऱ्या मोल्नुपिराविर (Molnupiravir) या अँटी व्हायरल गोळीला मंजुरी दिलेली नाही. पण ही गोळी तसेच आणखी काही कोरोना प्रतिबंधक औषधे विकसित करुन बाजारात आणण्यात यश मिळाले तर कोरोना संकटावर मात करणे आणखी सोपे होईल.

इंग्लंड सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोल्नुपिराविर या अँटी व्हायरल गोळीचा (Anti-viral pill) साठा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ऑक्टोबर 2021 मध्येच इंग्लंडच्या आरोग्य विभागाने 4 लाख 80 हजार गोळ्यांचा साठा केला होता. या साठ्यात वाढ केली जात आहे.

देशातील कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेल्या अनेक रुग्णांवर मोल्नुपिराविर या अँटी व्हायरल गोळीद्वारे उपचार करण्याची इंग्लंड सरकारची योजना आहे. यासाठी नियोजन सुरू आहे. या बातमीमुळे मात्र कोरोना लसीची धास्ती व भिती घेतलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Exit mobile version