माजलगाव दि.13 मे – माजलगाव तालुक्यातील वारुळा शिवारात असलेल्या विहीरीत अज्ञात इसमाने दि.11 मे बुधवार रोजी अज्ञात इसमाचा खुन करुन त्याचा कमरे खालील शरीराचा भाग विहीरीत सापडल्याने परीसरात खळबळ माजली असून याबाबत माजलगाव ग्रामिण पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेगाव टाकरवण दरम्यान असलेल्या रामनगर परीसरात परमेश्वर बापुराव कदम रा.वारुळा याच्या शेतातील विहीरीत दि. 11 मे 2022 रोजी एक प्रेत तरंगतांना दिसल्याची माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच सपोनि निलेश इधाटे, पो.ना .देवकते, पो .कॉ खराडे यांनी 10.30 वाजता घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी वारोळा शिवारातील शेत गट नं . 113 या शेतातील विहीरीमध्ये सदर प्रेत कमरेपासुन खाली असलेला मानवी शरिराचा भाग गावातील लोकांचे मदतीने विहीरीत लाकडी बाज टाकुन बाहेर काढले.
सदरच्या प्रेताला फक्त कमरेपासुन खाली गुडघ्यापर्यंत कुजलेल्या अवस्थेत मास असलेले स्थितीत दिसुन आले. सदर प्रेताचे अंगात एक काळया रंगाची फुल पॅन्ट होती. सदर पॅन्टच्या खिशामध्ये एका छोटया कॅरीबॅगमध्ये वेगवेगळया महिलांचे पासपोर्ट साईजचे फोटो मिळुन आले . सदर मानवी शरिराचा भाग अतिशय कुजलेल्या स्थितीमध्ये असल्याने टाकरवण वैद्यकिय अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून त्यांनी प्रेताची पाहणी करण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
प्रेत पुढील कार्यवाही साठी स्वा.रा.ती. ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे नेण्यात अले. सदर अनोळखी इसम नाव गाव माहित नाही याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्येशाने त्याच्या शरिराचे तुकडे करुन कमरेखालचा भाग वारोळा शिवारातील शेत गट नं . 113 मधील विहीरीतील पाण्यात टाकला म्हणुन पो.ना.रवि राठोड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली असून चर्चेला उधान आले आहे. दिंद्रुड पोलीसात दिगंबर गाडेकर हा इसम गायब असल्याची नोंद असून पोलीस त्या दृष्टीकोनातुन पुढील तपास करत आहेत.
( The lower part of the human body found in the well; Excitement in Majalgaon taluka, murder case registered with police. )