BEED24

आता निवडणूकी नंतर होणार नव्याने सरपंच पदाचे आरक्षण

मुंबई : दि.१५- राज्य सरकारच्या नवीन निर्णयानूसार  ग्रामपंचायत निवडणुकी नंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकी आधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द असेल. ग्रामविकास मंत्रालयाने (Rural development minister) हा निर्णय घेतला. त्यानंतरच संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द केलं आहे. राज्यातल्या १४ हजार ग्रामपंचायतीच्या (Gram panchyat) राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने काल घेतला आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची (Sarpanch) सोडत जाहीर होत होती. पण सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला. यामुळे १४ हजार ग्रामपंचायतींच्या (Gram panchyat) सरपंचांची (Sarpanch) आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री (Rural development minister) हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. राज्यात ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version