बीड दि.26 मार्च- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्ण संख्या आज पुन्हा चारशेच्या जवळ पोहोचली आहे. काल 335 असलेली संख्या आज ३८३ झाली आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2605 प्राप्त अहवाला पैकी 335 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2222 जण निगेटिव्ह आली आहेत. आज एकेविसाव्या दिवशी बीड तालुक्यात 119 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत.
(The number of Beed district is close to four hundred; Centuries in Ambajogai, 10 in Dharur and 28 in Kaij;)
अंबाजोगाईत आज शतक गाठले आहे. आष्टी, परळी, केज व गेवराईत संख्या वाढली आहे. धारुरमध्ये 10 तर केजमध्ये 28 तर माजलगाव मध्ये 27 कोरोना बाधित आढळून आली आहेत.
(Re-growth in Beed district; Cage, Ambajogai, Beed’s anxiety increased;)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-119, अंबाजोगाई-100, आष्टी-20, धारुर-10, गेवराई-21, केज-28, माजलगाव-27, परळी-33, पाटोदा-7, शिरुर-0, वडवणी-6
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.26 शुक्रवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 335 वरुन 383 वर आली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्याचा आज पहिला दिवस असून जिल्ह्यात लॉकडाऊनला विरोध वाढत आहे.
दरम्यान, गुरुवारी राज्यात दिवसभरात 35 हजारावर नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत.