BEED24

पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कोरोना पॉझिटीव्हची संख्या १६७

नाशिकः दि.२५- महाराष्ट्र पोलीस (Police) प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना कोरोनाची (corona) लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर तपासणी वाढवण्यात आली. त्यात १६७ बाधित आढळून आले आहेत.

पंधरा डिसेंबर पुर्वी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एका प्रशिक्षणार्थीला सुट्टी देण्यात आली होती. पंधरा डिसेंबरला अकादमीमध्ये परतल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने करण्यात आलेल्या तपासणीत संबंधित कर्मचारी कोरोना (corona) पॉझिटिव्ह (Positive) आढळल्याने सोळा डिसेंबरला ४२१ प्रशिक्षणार्थींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यात १५१ बाधित आढळले. यानंतर अकादमीत स्वॅब व रॅपिड ॲण्टीजेन मिळून एकुण ८९४ तपासण्या करण्यात आल्या. त्यातून १६७ बाधितांचा आकडा समोर आला आहे. अकादमी मध्ये सातशे प्रशिक्षणार्थी, कॅण्टीन, हॉस्टेल व अन्य सातशे असे एकुण १४०० जण राहतात. यात ५०६ जणांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. पॉझिटीव्ह (Positive) आढळलेल्यांपैकी बहुतांश पोलिस (Police) उपनिरीक्षक असून त्यांना ठक्कर डोम कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version