किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज १९ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या त्यात एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. तर काल पाठवलेली ७६ स्वॅब (Swab) नमुन्यातील ३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजच्या पॉझिटीव्ह (Poaitive) रुग्णात १ शिक्षक व ३ संशयित रुग्ण आहेत.
आज तब्बल ७६ जनांचे स्वॅब (Swab) तपासणी पैकी केवळ ३ जन पॉझिटीव्ह (Positive) आली. कालच्या ८६ मध्ये २ पॉझिटीव्ह आढळली होती. आज पुन्हा ४० शालेय कर्मचारी आणि २१ संशयितांचे स्वॅब असे ६१ नमुने अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन Antigen तपासणीत आढळलेले रुग्ण
१. ४६ वर्षीय पुरुष, एसटी कर्मचारी, धारुर
स्वॅब Swab तपासणीत आढळलेले रुग्ण
२. ७० वर्षीय पुरुष, आयोध्या नगर, धारुर
३. ६५ वर्षीय स्त्री, आयोध्या नगर, धारुर
४. ४८ वर्षीय स्त्री, शिक्षिका, धारुर
यांचा समावेश आहे.