BEED24

धारुरच्या कोरोना बळीची संख्या एकने वाढली…. पहा कुठला आहे मृत्यू

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) तालुक्यातील ७५ वर्षीय वृध्दाचे अंबाजोगाई येथे कोरोना वर उपचार सुरु असताना दि.२८ बुधवारी रात्री ८.३० वाजता निधन झाले. कोरोना (Corona) बळीत धारुरचा हा २५ वा बळी (Death) आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारुर शहर व तालुक्यातही कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३.५ टक्के आहे. शहर व तालुक्यातून कोरोनामुळे मरणाऱ्यामध्ये वृध्दांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यातील हिंगणी येथील एक ७५ वर्षीय वृध्द दि.२० आक्टोंबर रोजी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात सलग ८ दिवस उपचार करण्यात आले. मात्र रात्री दि.२८ रोजी ८.३० वाजता त्यांचे निधन झाले. तालुक्यातून कोविड-१९ (Covid-19) लागण होवून मृत (Death) पावणाऱ्यांची संख्या आता २५ झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत ७१३ जनांना कोविड-१९ (Covid-19) ची लागण झाल्याची नोंद असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.

Exit mobile version