BEED24

मराठा आरक्षण क्रांती मोर्चाचं आजपासून आंदोलनाचे तिसरे पर्व तुळजापूरातून सुरु

तुळजापूरः-दि.९- मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी  आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरूवात होत आहे. यात हजारोंच्या संख्येत तरुण सहभागी होत आहेत.

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत हा एल्गार आता थांबणार नाही, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. राज्य सरकारने यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये, अशी मागणीही राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. नसता परिक्षा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठोक मोर्चाच्या वतीने विविध स्वरुपाचे आंदोलन करण्यात येत आहेत. आजच्या या तिसऱ्या पर्वाच्या ठोक आंदोलनाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत आहे. मराठवाड्यात यापुर्वीच विविध जिल्ह्यात आंदोलनाचे लोण पेटलेले आहे. आजच्या तिसऱ्या पर्वातही हजारो मराठा तरुण सहभागी होत आहेत.

Exit mobile version