BEED24

धारुर घाटात बर्निंग कारचा थरार…

किल्लेधारूर दि.1 एप्रिल – धारुर घाटात बर्निंग कारचा (burning car) थरार आज दि.1 एप्रिल शनिवारी सकाळी नऊ वाजता अनेकांनी अनुभवला. माजलगावकडे जाणारी टाटाची (TATA) कार घाटात एका वळणावर अचानक पेटली असून सुदैवाने यात कसलीही जिवितहानी झालेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतत अपघाताच्या घटनांनी प्रसिध्दीस येत असलेल्या धारुर घाटात (Dharur Ghat) आज पेटत्या कारचा (burning car) थरार अनेकांनी अनुभवला. घाटाच्या पायथ्याजवळील वळणावर टाटा ( TATA ) कंपनीची इंडीगो कार क्र. एमएच 14 सीएस 5352 आज सकाळी 9 च्या सुमारास माजलगावकडे जात असताना अचानक पेट घेतला. सदर कार पेटलेल्या अवस्थेत असताना मात्र जवळपास बघ्यांची मोठी गर्दी होती. कार कोणाची होती? कशामुळे पेटली? कारमध्ये कुणी होते का? याची माहिती मिळू शकली नाही.

( The thrill of burning cars in Dharur Ghat… )

Exit mobile version