BEED24

धारुरमध्ये आजही खेळला जातो परंपरागत सोंगत्याचा खेळ

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) धारूर Dharur येथील हनुमान मंदिरात नवरात्री च्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीने सोंगत्याचा Songtya खेळ परिसरातील जेष्ठ नागरिक खेळतात. हा शेकडो वर्षापूर्वीचा खेळ आजही जतन केला आहे. हा खेळ महादेव व देवी पार्वती यांनी खेळलेला आहे व याला कौरव पांडवांचा खेळ या नावाने ही ओळखले जाते. दसऱ्या दिवशी मंदिरात खेळत असलेल्या ज्येष्ठ नागरीकांची भेट घेवून याबाबत माहिती घेण्यात आली.

चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. दसऱ्या दिवशी आपट्याचे पान सोने म्हणून वाटणे ही परंपरा आहे. अशीच एक परंपरा धारुर शहरात आढळते. धारूर Dharur येथील हनुमान मंदिरात नवरात्री च्या दिवसामध्ये पारंपरिक पद्धतीने सोंगत्याचा Songtya खेळ परिसरातील जेष्ठ नागरिक खेळतात. हा शेकडो वर्षापूर्वीचा खेळ आजही जतन केला आहे . हा खेळ महादेव व देवी पार्वती यांनी खेळलेला आहे व याला कौरव पांडवांचा खेल या नावाने ही ओळखले जाते. हा खेळ दसऱ्याच्या काळात खेळला जातो. ह्या खेळामध्ये सहा कवड्या असतात सोळा गोट्या असतात व ९६ घर असतात व हा खेळ जवळपास एक ते दिड तास चालतो. हा खेळ हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनी चालू ठेवला आहे. यात लक्ष्मण धोतरे, शेरकर मामा, रावण शिंदे, रतन जेधे, सुदाम चिरके, महेश गवळी यांनी हा खेळ जतन करून ठेवला आहे.

Exit mobile version