BEED24

लिव इन रिलेशनशिप मधील “त्या” तरुणीचा करुण अंत;

 

बीडः दि.१५- पुण्याहून गावाकडे परतत असताना बीड तालुक्यातील येळंबघाट येथे काल अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या तरुणीचा आज करुण अंत झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल सकाळी ऐन लक्ष्मीपुजना दिवशी रस्त्याच्या कडेला विव्हळण्याच्या आवाज आल्याने अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणी आढळून आली होती. यानंतर सदरील प्रकाराचा खुलासा होवून पुण्याहून परतत असताना प्रियकरानेच हे कांड केल्याचे उघड झाले होते. पहाटे अंगावर ॲसिड टाकून पेट्रोलने तरुणीला जाळण्याचा प्रयत्न केला. सदरील तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज दुपारी तिचा करुण अंत झाला. सदरील तरुणीचे नाव सावित्रा (२२) असून ती शेळगाव येथील अविनाश राजुरे याच्या सोबत लिव इन रिलेशनशिप live in relationship  मध्ये राहत होते. काल दुचाकीवरुन गावाकडे परतत असताना येळंबघाट येथे पहाटे प्रियकराने हे कांड केले. याबाबत प्रियकरा विरुध्द नेकनुर पोलिसात Police गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Exit mobile version