बीडः आत्ताच आलेल्या वृत्तानुसार अर्ध्यातासापुर्वी सुमारे सहा वाजता आष्टी (Ashti) तालुक्यातील मंगरुळ येथे एका मायलेकरावर बिबट्याने (Leopard) हल्ला केला असून आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. या जखमीना आष्टीच्या (Ashti) उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीत शिलावती दत्तात्रय दिंडे(३३) व त्यांचा मुलगा अभिषेक(१५) यांचा समावेश आहे. मंगरुळ गावातील लोकांनी एकाच वेळी तीन बिबट (Leopard) पाहिल्याची चर्चा या भागात होत आहे. यामुळे संपूर्ण आष्टी तालुका बिबट्याच्या भितीच्या सावटाखाली आला आहे.
बिबट्याचा थरार सुरुच…. आता मायलेकरावर हल्ला…मंगरुळमध्ये आढळली तीन बिबट
