BEED24

धारुर घाटात लटकत्या ट्रकचा थरार… अपघाताची मालिका सुरुच.

किल्लेधारूर दि.15 जुलै – धारूर येथील घाटात (Ghat) अरूंद रस्ता असल्याने अपघाताची मालिका सुरूच असून गुरूवारी सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान अवघड वळणावर साखर घेऊन परभणी कडे जाणारा ट्रक क्र. एम. एच. 22 एल. 0032 हा पलटी झाला. ट्रक अक्षरशः रस्ता व दरी यात लटकलेल्या अवस्थेत पडला. यावेळी लटकत्या ट्रकचा थरार (The tremor of a truck hanging) अनेकांनी पाहिला. या अपघातात सुदैवाने जिवितहानी झालेली नाही मात्र ट्रक चालक जखमी झाला होवून साखरेचे व ट्रक चे मोठे नुकसान झाले.
(The tremor of a truck hanging in Dharur Ghat … The series of accidents continues.)

धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात (Dharur Ghat) राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) काम करताना आहे त्याच रस्त्याचे काम फक्त चकचकीत डांबरीकरण करून करण्यात आले. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली व सुरक्षा कठडे रस्त्या बरोबरीला आल्याने बाजूला असणारी मोठी दरी वाहना साठी धोकादायक झाली. रस्त्याची रुंदी अपुरी असल्याने घाट हा वाहनासाठी धोकादायक झाला आहे.

यामुळे नियमीत अपघात (Accident) होत असून अपघाताची मालिका थांबत नाही. वाहनधारकाना जिव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. गुरूवारी सकाळी टेंभूर्णी येथील विठ्ठल साखर कारखान्यात साखर भरून परभणी कडे जाणारे ट्रक क्र.एम एच 22 एल 0032 हा घाटात अवघड वळणावर समोरून येणाऱ्या बसच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याचे एका बाजूला घेत असताना पलटी झाल्याने ट्रक मधील साखरेचे पोते रस्त्यावर पडले. या अपघातात ट्रक चालक अशोक सुरवसे हा जखमी झाला. त्यांला उपचारासाठी धारूर ग्रामीण रुग्नालयात हलवण्यात आले.

या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रक मधील साखर तात्काळ दुसऱ्या वाहनात सुरक्षित हलवण्यात आली. या अपघात (Accident) प्रकरणी धारूर पोलीस (Police) स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली असून ए. एस. आय. गोंविद बास्टे यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे.

Exit mobile version