मुंबई दि.14 जुलै – राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती. अखेर निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल (SSC Results) लागणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या (evaluation) आधारे निकाल दिला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल (online result) पाहता येणार आहे.
(The wait is over …. Tomorrow at 1 p.m.)
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागेल अशी माहिती दिली होती. राज्य सरकारने निकालासाठी दिलेली डेडलाईन आज संपत आहे. त्यामुळे दहावाचा निकाल लांबणीवर पडणार असल्याची शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु, दहावीचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे. राज्यातील 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
असा पहा निकाल
दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.
असा तपासता येईल तुमचा निकाल
अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com
-मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
-आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
-आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा.
-आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.
संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.