नवी दिल्ली दि.5 – हवामान खात्याने (Weather department) येत्या 3 महिन्यांचा काळ हा भयंकर गरमीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे. गेल्या वर्षभरात वातावरणात प्रचंड बदल झाल्यामुळे यंदाच्या वर्षी कडाक्याचा उन्हाळा (summer) सहन करावा लागणार आहे. अशी माहिती हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी दिली आहे.
(The weather department predicted this for the summer; Many states, including Maharashtra, are worried for the next three months)
केंद्रीय हवामान खात्याच्या (Weather department) अंदाजानुसार, यंदा जास्तीत जास्त तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे. विशेषत: उत्तर पश्चिम भारत म्हणजेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व ईशान्य भारतातील काही भाग म्हणजे बिहार, बंगाल, झारखंड इथं अधिक राहील. अशात मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागातही हवामान गरम असू शकतं.
यंदा गोवाही तापणार
गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, छत्तीसगड आणि ओडिशामध्येही या वेळी जास्तीत जास्त तापमान नेहमीच्या वर जाईल. त्याशिवाय कोकण गोवा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. इतकंच नाहीतर इतर राज्यांत तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी असेल.
आनंद शर्मा (Anand Sharma) पुढे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानही सामान्यपेक्षा खूपच जास्त होतं. साधारणपणे पंधरा वर्षानंतर 2006 नंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये इतकी उष्णता जाणवली आहे. ते म्हणाले की, प्रशांत महासागरात हिवाळ्यात एल निनोचा प्रभाव जास्त असल्यामुळे हिवाळाही जास्त होता. परंतु आता त्याचा परिणाम कमी होताना दिसत आहे. यामुळे उष्णता वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे.