किल्लेधारूर दि.3 डिसेंबर – theft session… धारूर Dharur तालुक्यातील गावंदरा येथे दोन ठिकाणी धाडसी चोरी झाली असून बीड जिल्हा बँकेचे DCC Bank माजी उपाध्यक्ष सुदाम बडे यांना मारहाण करत घरातील एक लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हि घटना घडली. तर आवरगावात विद्युत मोटारी चोरीचे सत्र सुरुच आहे.
धारुर Dharur तालुक्यातील गावंदरा येथे दोन ठिकाणी चोरीची घटना घडली असून बीड DCC Bank जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सुदामराव बडे यांच्या घरी चोरट्यांनी त्यांना मारहाण करत सोने चोरी केले आहे. पहाटे दोन वाजता तीन चोर सुदाम बडे यांच्या घरामध्ये घुसले. कपाट चाळू लागले यावेळी आवाज आल्याने सुदाम बडे यांना जाग आली. सुदामराव बडे यांनी आरडा ओरड केल्याने चोरट्यांनी त्यांच्या तोंडावर दगडाचा मारा केला. यामध्ये त्यांच्या तोंडावर मार लागला आहे. तेथील ग्रामस्थ जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पोबारा केला. त्याच ठिकाणी रस्त्यावर असलेल्या तुकाराम घुले यांच्या घरी देखील चोरट्यांनी चोरी केली. त्यावेळी चोरांनी तुकाराम घुले यांच्या घरातील नगदी रोकड दहा हजार रुपये तसेच इतर साहित्य चोरी केले आहे. सुदामराव बडे यांना तोंडावर मार लागल्याने त्यांना बीड येथील स्पंदन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. यामुळे गावंदरा येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून धारूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अज्ञात चोरट्या विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
आवरगावात चोरीचे सत्र….
तालुक्यातील आवरगाव येथे १ डिसेंबरच्या रात्री उशीरा चोरानी धुमाकूळ घालत चार ते पाच शेतकऱ्याचे शेतातील विद्यूत मोटारी चोरून नेल्याचे घटना घडली असून चोर पसार झाले आहेत. शेतकऱ्यामध्ये मात्र वारंवार घडणाऱ्या घटना मुळे भितीचे वातावरण पसरले असून या चोरी प्रकरणी धारूर पोलीस Police स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे असे आवरगावचे सरपंच अमोल जगताप यांनी सांगीतले. यापुर्वीही आवरगावात विद्युत मोटारी व सौरउर्जाचे प्लेट चोरीच्या घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरांचा पोलिसांनी Police तात्काळ बंदोबंस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.