BEED24

एसटी कर्मचाऱ्यांसह आज आढळले येवढे कोरोना रुग्ण….पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) निरंक असलेली संख्या दोन दिवसांपासून पुढेषावाढत आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसह एकुण ३६ ॲन्टीजन (antigen) तपासणीत ८ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. तर काल पाठवलेल्या ७ स्वॅब (Swab) पैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

दोन दिवसांपासून पॉझिटीव्ह (positive) रुग्णांचा आकडा निरंक होता. मात्र काल पासुन कोरोना मीटर सुरु झाले आहे. आज कोविड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजन तपासण्यात आलेल्या ३६ पैकी ८ जन पॉझिटीव्ह आढळले आहेत. काल ७ स्वॅब (Swab) पाठवण्यात आली होती. यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज १९ एसटी कर्मचाऱ्यांसह २८ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली. आज आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णात एसटी महामंडळातील मुंबईहून परतलेल्या ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ४४ वर्षीय पुरुष, एसटी कर्मचारी, धारुर

२. ५१ वर्षीय पुरुष, एसटी कर्मचारी, धारुर

३. ३१ वर्षीय पुरुष, एसटी कर्मचारी, धारुर

४. ३२ वर्षीय पुरुष, एसटी कर्मचारी, धारुर

५. ३१ वर्षीय पुरुष, एसटी कर्मचारी, धारुर

६. ३४ वर्षीय पुरुष, एसटी कर्मचारी, धारुर

७. ३२ वर्षीय पुरुष, एसटी कर्मचारी, धारुर

८. ३७ वर्षीय पुरुष, कृ.उ.बा.स., धारुर

स्वॅब Swab

९. ६० वर्षीय स्त्री, कोमटवार गल्ली, धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version