BEED24

तेलगावात रो हाऊस मध्ये घुसून चोरट्यांचा धुडघूस; पुरुषांसह महिलांना मारहाण करत दागिन्यांसह 3 लाख लंपास.

किल्लेधारूर दि.30 जुलै – धारुर (Dharur) तालुक्यातील तेलगाव येथे श्रीकृष्ण पार्क येथील रो हाऊस (Row House) मध्ये मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत महिला पुरुषांना मारहाण करून अंगावरील दागिने तसेच घरातील तीन लाख रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली.

(Thieves broke into a row house in Telgaon; 3 lakh lampas with jewelery beating women along with men.)

तेलगावमधील श्रीकृष्ण पार्क येथील रो हाऊस येथे राहणाऱ्या लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री बारा एक च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत महिला पुरुषांना मारहाण करून अंगावरील दागिने तसेच घरातील तीन लाख रुपये रोख रक्कम चोरीची घटना (Incident of theft) घडली. यामुळे तेलगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी घरात धुडगुस घालत पुरुषांसह महिलांनाही गंभीर स्वरुपाची मारहाण केली आहे. कुटुंबियांना मारहाण करत महिलांच्या अंगावरील दागदागिने तसेच घरात ठेवण्यात आलेले तीन लाख रुपये चोरट्यांनी पळविले आहे. या धाडसी चोरीमुळे तेलगाव मध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटना समजताच दिंद्रुड पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Exit mobile version