BEED24

असा आहे धारूर तालूक्यातील दहावीचा निकाल; 22 शाळांचा निकाल 99.90 टक्के

किल्लेधारूर दि.16 जुलै – दहावी परीक्षेचा निकाल (SSC Results) आज जाहीर करण्यात आला. परीक्षा न घेता अंतर्गत मुल्यमापन (evaluation) करून तालुक्यातील 22 शाळांचा निकाल 99.90 टक्के लागला. या पैकी 21 शाळाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मात्र सर्वर (server) डाऊन असल्याने विद्यार्थ्याना वैयक्तिक निकाल पाहण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली होती.

(This is the result of 10th in Dharur taluka; The result of 22 schools is 99.90 percent)

यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल (SSC Results) परीक्षा न घेता कोरोना प्रादूर्भाव चे परीस्थीती मुळे अंतर्गत मुल्यमापन (evaluation) करून लावण्यात आला. धारूर तालूक्यात 22 माध्यमिक शाळेचे 1035 विद्यार्थी होते. या पैकी 1034 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. यात 1033 विद्यार्थी उतीर्ण झाले. फक्त एक विद्यार्थी अनूउत्तीर्ण झाला.

तालूक्याचा निकाल 99.90 टक्के निकाल लागला असून 22 पैकी 21 शाळाचा निकाल शंभर टक्के लागला. उर्दू मिलीया हायस्कूल शाळा धारूर (Dharur) चा फक्त 96.55 टक्के निकाल लागला असून तालूक्यात 657 विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर 367 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्वच विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे. मात्र विद्यार्थ्याना सर्वर (server) डाऊन असल्यामुळे वैयक्तिक निकाल पहाता आला नसल्यामुळे विद्यार्थ्यांत नाराजी दिसुन येत होती.

Exit mobile version