नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दि.4 अॉगस्ट – भारतासह काही देशांना कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) येण्याचा इशारा देण्यात येत असताना एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुक्त (Corona free) झाल्यानंतर पुढचे दोन आठवडे हार्ट अटॅकचा (Heart attack) धोका सर्वांत जास्त असतो, असे लंडन येथील सुप्रसिद्ध जर्नल द लँसेटच्या (Journal The Lancet) संशोधनात समोर आले असल्याचे वृत्त आघाडीच्या वृत्तपत्रांनी प्रकाशित केले आहे.
(Those who recover from corona have a two-week higher risk of heart attack; Research in the journal The Lancet.)
गेल्या दिड वर्षांपासून जगात कोरोना संसर्गाचे (Corona infection) थैमान सुरु आहे. कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना यावर वेगवेगळ्या देशात संशोधन (Research) सुरु आहे. कोरोना निर्मुलनासह कोरोनानंतर होणाऱ्या इतर आजारावर संशोधन सुरु आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत म्युकरमायोसिस (mucormycosis) सारखे आजार समोर आल्यानंतर चिंता वाढली होती. तर कोरोना रुग्णांत हार्ट अटॅकचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून आले होते.
सध्या जगात वेगवेगळ्या देशात पहिल्या लाटेनंतर दुसरी व तिसरी लाटही आलेली आहे. भारतातही तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. यातच लंडन (London) येथील सुप्रसिद्ध जर्नल द लँसेट यांनी केलेल्या एका संशोधनातून कोरोनातून बरे झाल्यानंतर पहिले दोन आठवडे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक यांचा धोका तीन पटीने वाढतो अशी बाब समोर आली आहे. लँसेटने स्वीडन (Sweden) येथे लाखो नागरिकांवर केलेल्या संशोधनातून सदर बाब समोर आल्याचे म्हटले गेले आहे.
हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका तिप्पट
स्वीडन येथे गतवर्षी 1 फेब्रुवारी ते 14 सप्टेंबर 2020 या कालावधीत 86 हजार 742 कोरोना रुग्ण आणि 3 लाख 48 हजार 481 सामान्य नागरिकांवर संशोधन करण्यात आले. येथील उमिया विद्यापीठातील अभ्यासकर्ते ओस्वाल्डो फोन्सेका रॉड्रिगेज यांच्या मतानूसार, कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका तीन पटीने वाढल्याचे दिसून आले. कोरोनामुक्त झालेल्यांचे वय, लिंग आणि सामाजिक- आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर ही बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे.