BEED24

तीन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू; गेवराईत एक तर बीडमध्ये दोघांचा समावेश.

बीड दि.19 अॉक्टोंबर – बीड (Beed) जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये पोहायला गेलेल्या तीन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे गेवराई (Gevrai) तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदावरी नदीमध्ये (Godavari) बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे.

(Three youths drowned; One in Gevrai and two in Beed.)

ओंकार लक्ष्मण काळे (वय 16), शिव संतोष पिंगळे (वय 16, दोघेही रा. बीड) व तान्हाजी लिंबाजी आरबड (वय 17, रा. सुरळेगाव ता. गेवराई) असे मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. यातील ओंकार काळे आणि शिव पिंगळे हे दोघेही, पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यातील पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही घटना काल सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. तर, गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे सकाळी 8 च्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेला तानाजी आरबड या तरुणाचा देखील गोदावरी नदीच्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. 3 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Exit mobile version