BEED24

दिवंगत पत्रकार गंगाधर सोमवंशी यांच्या कुटुंबियांना डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनची लाखाची मदत

लातूर:-दि.९-“जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी” या न्यायाने मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या पाठिशी असते. राज्यात कोरोनानं किंवा तत्सम आजारानं गेल्या चार महिन्यात 43 पत्रकारांचे बळी गेले आहेत. त्यापैकी लातूरचे गंगाधर सोमवंशी एक आहेत. सोमवंशी यांना कोरोना झाला आणि वेळेत आणि योग्य उपचार न झाल्यानं त्यांचं निधन झाले. एका सामांन्य पत्रकाराचं कुटुंब रस्त्यावर आलं.. ही बातमी जेव्हा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांना समजली तेव्हा त्यांनी एकनाथराव शिंदे आणि मंगेश चिवटे यांना विनंती करून डॉ. श्रीकांत शिंदे फौऊंडेशनच्या वतीने सोमवंशी कुटुंबियांना मदत करण्याची विनंती केली. त्याचा सतत पाठपुरावा केला. काल अखेर त्यास यश आले गंगाधर सोमवंशी यांच्या कुटुंबियांना डॉ. श्रीकांत शिंदे फौंऊडेशनकडून एक लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. डॉ. एकनाथ शिंदे फौंऊंडेशनने मुंबई आणि ठाण्यातील अनेक पत्रकारांना कोरोना काळात मदत केली आहे. पाथरी आणि अन्य ठिकाणच्या पत्रकारांना देखील एकनाथराव शिंदे Eknath Shinde आणि फौडेशनने मदत केली आहे. गंगाधर सोमवंशी यांच्या नातेवाईकांना केलेल्या मदती बदलल मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख S.M. Deshmukh यांनी एकनाथराव शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फौंऊंडेश व मंगेश चिवटे Mangesh Chivate यांचे आभार मानले आहेत.

काल ठाण्याचे माजी महापौर आणि लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी सोमवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन रक्कम सोमवंशी कुटुंबियांना दिली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा संघटक सुनीताताई चाळक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन, पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिंह घोणे, अमर बुरबुरे, राजकुमार मोगले, प्रसाद सूर्यराव तसेच अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. परिषदेने केवळ मदत मिळवूनच दिली नाही तर मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने देखील सोमवंशी कुटुंबाला 21 हजार रूपयांचा धनादेश परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन आणि लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिंह घोणे यांच्या हस्ते देण्यात आला. संतोष सोमवंशी यांनी मदतीबद्दल एकनाथराव शिंदे Eknath Shinde, मंगेश चिवटे Mangesh Chivate , एस.एम.देशमुख S.M. Deshmukh, अनिल महाजन, नृसिंह घोणे आणि सर्वांचे आभार मानले आहेत..

Exit mobile version