BEED24

आज धारुरची कोरोना आकडेवारी….पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ ४ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यात १ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहे. तर काल पाठवलेल्या १० स्वॅब (Swab) पैकी २ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत.

दिवसेंदिवस कोरोना corona बाबतीत लोकांमध्ये भिती गायब होत असल्याचे दिसुन येते. सर्वकाही सुरळीत होत असताना गेल्या चार दिवसांत मात्र कोरोना corona पॉझिटीव्ह positive  येणाऱ्या रुग्णांची संख्या तपासणी कमी असताना आढळून येतआहे. आज कोविड covid-19 केअर सेंटरमध्ये ४ ॲन्टीजन Antigen तपासण्या करण्यात आल्या. यात १ जन पॉझिटीव्ह आढळला आहे. काल १० स्वॅब (Swab) पाठवण्यात आली होती. यात २ अहवाल पॉझिटीव्ह आली असल्याने ३ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली आहेत. आज केवळ २ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ३१ वर्षीय पुरुष, आरोपी, चोंडी, ता. धारुर

स्वॅब Swab तपासणीत आढळलेले रुग्ण

२. २६ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता.धारुर

३. ५० वर्षीय पुरुष, थेटेगव्हाण, ता. धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version