BEED24

आजची पॉझिटीव्ह संख्या वाढली….पहा किती व कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) धारुर तालुक्यातील आजच्या तपासणीत कोरोना (Corona) बाधितांची संख्या ११ आहे. काल पाठवलेली  २८ स्वॅब (swab) चा अहवाल प्राप्त झाला असुन ही सर्व निगेटिव्ह आल्याची समाधानकारक माहिती मिळाली. इतर ठिकाणाहून तालुक्यातील  ६ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. तर १२ ॲन्टीजन तपासणीत ५ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत.

आज धारुर तालुक्याची कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या ११ ने वाढली आहे. यात धारुर शहरातील ३ तर चोरांबा व पहाडी पारगाव येथील प्रत्येकी  एकाचा समावेश आहे. एकुण १२ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत ५ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या २८ स्वॅब (swab) नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील ६ जनाचा अहवाल इतर ठिकाणाहून  पॉझिटीव्ह आला असला तरी अद्याप त्याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. आज २८ जनांचे स्वॅब (swab) नमुने तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आली आहेत.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१. ५५ वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव,ता.धारुर

२. ४५ वर्षीय पुरुष, चोरांबा, ता.धारुर

३. ३६ वर्षीय स्त्री, लक्ष्मी नगर, धारुर

४. १२ वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर, धारुर

५. ३५ वर्षीय पुरुष, पाटील गल्ली, धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version