किल्लेधारूर दि.१७(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या ७ ॲन्टीजन (antigen) तपासणीत एकही पॉझिटीव्ह आढळला नसून सर्व निगेटिव्ह आली आहेत. मात्र येथून काल पाठवण्यात आलेल्या २२ स्वॅब (Swab) पैकी २ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. एकंदरीत आज कोरोना बाधितांची संख्या कमी आल्याने समाधानकारक चित्र दिसुन आले आहे.
गेल्या काही दिवसात संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आज केवळ ७ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. या सर्व तपासणीत एकही पॉझिटीव्ह आढळला नसून सर्व निगेटिव्ह आले आहेत. काल पाठवलेल्या २२ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी २ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. आज १७ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले
१. ४१ वर्षीय पुरुष, कटघरपुरा, धारुर
२. ३३ वर्षीय पुरुष, चोरांबा, ता.धारुर
यांचा समावेश आहे.