किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या ७ संशयितांच्या ॲन्टीजन (antigen) तपासणीत केवळ एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला. तर येथून काल पाठवण्यात आलेल्या ४३ स्वॅब पैकी दोन पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. एकंदरीत आजही कोरोना बाधितांची संख्या आवाक्यात असल्याचे दिसुन येते.
३१ जुलै २०२० पासून शहरात दररोज कोरोना (Corona) बाधितांची संख्या आढळून येत आहे. सदरील संख्येत दररोज वाढता आलेख आढळून येत होता. गेल्या काही दिवसात संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसत आहे. आज केवळ ७ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात एक पॉझिटीव्ह आढळला तर ४३ स्वॅब (Swab) नमुन्यात २ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. अशी एकुण ३ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन तपासणीत आढळून आलेला कोरोना (Corona) पॉझिटीव्ह (positive) रुग्ण हा ५५ वर्षीय पुरुष तालुक्यातील भायजळी या गावातील आहे.
स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले
४२ वर्षीय पुरुष, अहिल्यानगर, धारुर
४८ वर्षीय स्त्री, आसोला, ता.धारुर
यांचा समावेश आहे.