बीड दि.4 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 3388 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 67 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3321 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-14, अंबाजोगाई-4, आष्टी-27, धारुर-4, गेवराई-0, केज-4, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-5, शिरुर-1, वडवणी-6 अशी आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी आटोक्यात आल्याचे चित्र आहे. काल दि.3 शुक्रवारी केवळ आष्टी तालुक्यात बाधितांची संख्या दोन आकड्यात होती. दि.1 सप्टेंबर रोजी 4028 अहवालात 79, दि.2 रोजी 3458 अहवालात 83, दि.3 रोजी 2873 अहवालात 57 कोरोना बाधित, तर आज 3368 अहवाल 67 बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान, राज्यात आज (शुक्रवार) 04 हजार 313 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 04 हजार 360 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 86 हजार 345 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.04 टक्के झाला आहे. आज 92 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 37 हजार 643 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका (Coronavirus in Maharashtra) झाला आहे.
राज्यात सध्या 50 हजार 466 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 44 लाख 87 हजार 950 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 64 लाख 77 हजार 987 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 02 लाख 98 हजार 098 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 1 हजार 954 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.