BEED24

आठ तालुके आटोक्यात … काय आहे आजची बीड जिल्ह्यातील कोरोना स्थिती; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.30 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 3807 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 74 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3733 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s corona disrupted in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-26, अंबाजोगाई-2, आष्टी-14, धारुर-0, गेवराई-6, केज-7, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-2, शिरुर-10, वडवणी-4 अशी आहे.

काल दि.29 शनिवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार दिवसभरात 1 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काल एकुण 95 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाल्यानंतरा आज 74 नवीन बाधित आढळून आली आहेत. जिल्ह्याचा नवीन बाधितांचा आकडा सारखा कमी जास्त होत आहे. कोरोना चाचणीची आजची संख्या कालपेक्षा कमी आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४ हजार ६६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ६६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ६३ हजार ४१६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५२ हजार ८४४ इतकी आहे.

 

Exit mobile version