BEED24

आजची कोरोना संख्या …..पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ ४ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यात १ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहे. तर काल पाठवलेल्या १३ स्वॅब (Swab) पैकी १ अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाबतीत लोकांमध्ये भिती गायब होत असल्याचे दिसुन येते. सर्वकाही सुरळीत होत असताना गेल्या चार दिवसांत मात्र कोरोना पॉझिटीव्ह (positive) येणाऱ्या रुग्णांची संख्या तपासणी कमी असतानाही आढळून येत आहे. आज कोविड केअर सेंटरमध्ये केवळ ४ ॲन्टीजन (antigen) तपासण्या करण्यात आल्या. यात १ जन पॉझिटीव्ह आढळला आहे. काल १३ स्वॅब (Swab) पाठवण्यात आली होती. यात १ अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने एकुण २ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली आहेत. आज केवळ ४ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. २८ वर्षीय पुरुष, कसबा, धारुर

स्वॅब Swab तपासणीत आढळलेले रुग्ण

२. २८ वर्षीय पुरुष, गांजपुर, ता.धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version