किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर)- आज दुसऱ्या दिवशीही संख्या समाधानकारक आली आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या १० संशयितांच्या ॲन्टीजन (antigen) तपासणीत ४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळली आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेल्या १२ स्वॅब पैकी २ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळले आहेत. आज पॉझिटीव्ह संख्या वाढल्याचे दिसुन आले.
काल आणि परवाची संख्या अत्यंत कमी होवून दिलासा मिळाला असताना आज संख्या पुन्हा वाढली आहे. आज १० ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात ४ पॉझिटीव्ह आढळली तर १२ स्वॅब (Swab) नमुन्यात दोघांचा पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाला आहे. आज १४ जनांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन (Antigen)
१. २१ वर्षीय स्त्री, आडस रोड, धारुर
२. ६४ वर्षीय पुरुष, आसोला, ता. धारुर
३. २४ वर्षीय पुरुष, मठ गल्ली, धारुर
४. १२ वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर, धारुर
स्वॅब (Swab)
५. ६० वर्षीय स्त्री, क्रांती चौक, धारुर
६. १४ वर्षीय स्त्री, क्रांती चौक, धारुर
यांचा समावेश आहे.