किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर)- आज दुसऱ्या दिवशीही संख्या समाधानकारक आली आहे. येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या ९ संशयितांच्या ॲन्टीजन (antigen) तपासणीत केवळ एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला. तर येथून काल पाठवण्यात आलेल्या १४ स्वॅब पैकी १ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळला आहे. एकंदरीत आजही कोरोना बाधितांची संख्या आवाक्यात असल्याचे दिसुन येते.
३१ जुलै २०२० पासून शहरात दररोज कोरोना (Corona) बाधितांची संख्या आढळून येत आहे. सदरील संख्येत दररोज वाढता आलेख आढळून येत होता. गेल्या तीन दिवसांपुर्वी संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत होते. मात्र काल आणि आज ही संख्या अत्यंत कमी होवून दिलासा मिळाला आहे. आज ९ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात एक पॉझिटीव्ह आढळला तर १४ स्वॅब (Swab) नमुन्यात एकाचा पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाला आहे. आज २० जनांचे स्वॅब नमुने पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
स्वॅब (Swab)
३८ वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली, धारुर
ॲन्टीजन (Antigen)
३० वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर
यांचा समावेश आहे.