बीड दि.10 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. आज 4085 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 188 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3897 जण निगेटिव्ह आली आहेत. आज जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी संख्या वाढलेली दिसुन आली.
(Today’s corona update from Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-30, अंबाजोगाई-6, आष्टी-81, धारुर-6, गेवराई-21, केज-15, माजलगाव-6, परळी-2, पाटोदा-17, शिरुर-5, वडवणी-5 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मंदावला वेग अधूनमधून वाढत आहे. दररोजच्या अहवालात नवीन बाधितांची संख्या शंभरीच्या आसपास स्थिरावलेली असताना अचानक वाढ दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे.
दरम्यान, राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात काल 8,992 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के आहे.
राज्यात काल 200 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 12 हजार 231 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.