BEED24

गुरुवारीही वाढ… बीड जिल्ह्यात आजचे कोरोना बाधित…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.5 अॉगस्ट – बीड (Beed) आज गुरुवारी  जिल्हा प्रशासनाकडे 4712 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 194 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4518 जण निगेटिव्ह आली आहेत. आजही संख्येत वाढ झाली.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-43, अंबाजोगाई-4, आष्टी-54, धारुर-12, गेवराई-7, केज-15, माजलगाव-7, परळी-1, पाटोदा-36, शिरुर-4, वडवणी-11 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात मंगळवारी 124 रुग्ण संख्या बुधवारी मात्र 181 वर गेली होती तर आज 194 आहे. सततच्या चढ उतारामुळे प्रशासनही संभ्रमावस्थेत आहे. एकीकडे महाराष्ट्रात संख्या उतरलेली असताना बीड जिल्ह्यात सतत संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात मृत्यू वाढले.
दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी 6 हजार 126 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 436 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 63 लाख 27 हजार 194 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 17 हजार 560 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.68 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात सध्या 72 हजार 810 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात 195 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 33 हजार 410 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 87 लाख 44 हजार 201 नमूने तपासण्यात आले आहेत.

Exit mobile version