BEED24

बीड जिल्ह्यातील रविवारची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.15 अॉगस्ट – आज शनिवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 5924 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 124 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5800 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-15, अंबाजोगाई-2, आष्टी-50, धारुर-5, गेवराई-3, केज-6, माजलगाव-5, परळी-2, पाटोदा-20, शिरुर-4, वडवणी-12 अशी आहे.

दरम्यान, राज्यात दैनंदिन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 5,787 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 86 हजार 223 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्के आहे.

राज्यात आज 134 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 07,59, 767 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,87, 863 (13.58 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,73,812 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 512व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Exit mobile version