बीड दि.27 जूलै – बीड (Beed) आज शनिवारी जिल्हा प्रशासनाकडे 3476 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 200 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3276 जण निगेटिव्ह आली आहेत. गेली सात दिवस जिल्ह्यात आढळत असलेली बाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. काल धारुर तालुक्यात बाधितांची संख्या वाढून 21 वर गेली होती ती आज 8 वर आहे. तर वडवणीत वाढ होत 15 संख्या आहे.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-34, अंबाजोगाई-5, आष्टी-55, धारुर-8, गेवराई-13, केज-15, माजलगाव-4, परळी-1, पाटोदा-25, शिरुर-25, वडवणी-15 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)
गेल्या सात दिवसांत बीड जिल्ह्यात तब्बल 29 हजार 253 जणांची तपासणी करण्यात आली. यात 1346 जण बाधित आढळली आहेत. ग्रामीण भागात अजूनही कोरोनाने फास आवळलेला आहे. काल दि.26 सोमवारी पाच कोरोना बाधित मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 2590 कोरोना मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्रात दिलासादायक परिस्थिती.
दरम्यान, राज्यात सोमवारी तब्बल पाच महिन्यांनंतर पाच हजारांहून कमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी 4 हजार 877 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर,53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 69 हजार 799 एवढी झाली आहे. त्यापैकी 60 लाख 46 हजार 106 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 11 हजार 077 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्येत मोठी घट झाली असून, सध्या 88 हजार 729 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आज 503 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.