बीड दि.30 जूलै – बीड (Beed) आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे 5379 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 180 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5199 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-36, अंबाजोगाई-2, आष्टी-43, धारुर-13, गेवराई-18, केज-14, माजलगाव-5, परळी-2, पाटोदा-18, शिरुर-22, वडवणी-7 अशी आहे.
(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)
बीड (Beed) जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने काल घेतला. बीडसह अकरा तालुक्यात हे निर्बंध कायम आहेत. जिल्ह्यातील चार तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाधित आढळत असल्यामुळे या तालुक्यात निर्बंध कडक करण्याच्या आदेशाला प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी मुदत वाढ दिली आहे. राज्यात बीड व सोलापूर जिल्ह्यातील वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती.
दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 7 हजार 242 रुग्ण आणि 190 मृत्यू यांची नोंद झाली. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी 11 हजार 124 जण बरे झाले. राज्यात झालेल्या 4 कोटी 75 लाख 59 हजार 938 कोरोना चाचण्यांपैकी 62 लाख 90 हजार 156 पॉझिटिव्ह आल्या.
राज्यात 4 लाख 87 हजार 704 जण होम क्वारंटाइन तर 3 हजार 245 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधीत झालेल्या 62 लाख 90 हजार 156 पैकी 60 लाख 75 हजार 888 जण बरे झाले. महाराष्ट्रात 1 लाख 32 हजार 335 कोरोनामृत्यू झाले आणि कोरोना झालेल्यांपैकी 3 हजार 371 जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. सध्या महाराष्ट्रात 78 हजार 562 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.