बीड दि.17 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3424 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 224 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3200 जण निगेटिव्ह आली आहेत. दररोज पेक्षा आज जास्त रुग्ण संख्या आढळली.ल्ह्यातील रुग्ण संख्येत किंचित वाढ दिसुन येत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-30, अंबाजोगाई-18, आष्टी-43, धारुर-8, गेवराई-28, केज-34, माजलगाव-6, परळी-20, पाटोदा-11, शिरुर-17, वडवणी-9 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत गेल्या काही दिवसात किंचित वाढ होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी नागरिकांना सक्त ताकिद दिली आहे. तरीही बाजार गजबजलेली दिसत आहेत. नागरीक कोविड नियम पाळत नसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात 237 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची (Corona death) नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासात नोंद झालेल्या एकूण 237 मृत्यूपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू (Corona death) कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.