बीड दि.21 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2350 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 124 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2226 जण निगेटिव्ह आली आहेत. वाढत असलेल्या संख्येमुळे गेल्या काही दिवसात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. यात समाधानकारक अहवाल येत आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)
अशी आहे आजची संख्या…
बीड-20, अंबाजोगाई-7, आष्टी-24, धारुर-6, गेवराई-10, केज-14, माजलगाव-4, परळी-1, पाटोदा-18, शिरुर-13, वडवणी-7 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत पुन्हा ब्रेक लागल्याची आंनददायक चित्र आहे. गेल्या काही दिवसात किंचित वाढ होत असल्यामुळे चिंता वाढली होती. इतर जिल्ह्यात दिलासादायक चित्र असताना बीड जिल्ह्यात मात्र पॉझिटीव्हीटी दर गेल्या आठवड्यापेक्षा 2 टक्क्याने वाढला.
राज्याला दिलासा…
दरम्यान, राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात सातत्याने गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Corona) घट पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 361 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 हजार 101 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 190 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 32 हजार 241 सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.