BEED24

कोरोनामुक्तीकडे वाटचाल … बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.6 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 3755 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 181 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3574 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या आज दोशेच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनामुक्तीकडे वाटचाल आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

बीड जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने अनलॉककडे वाटचाल सुरु आहे. आज बीड तालुक्यात 30 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. रुग्णसंख्येत सतत मोठा आकडा असलेल्या अंबाजोगाईत गेल्या आठवड्यापासून समाधानकारक स्थिती आहे. बीडनंतर सध्या आष्टीत रुग्ण संख्या इतर तालुक्याच्या तुलनेत अधिक आहे. आज अंबाजोगाईत केवळ 11 व आष्टी तालुक्यात 38 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 10 तर केजमध्ये 29 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-38, अंबाजोगाई-11, आष्टी-38, धारुर-10, गेवराई-16, केज-29, माजलगाव-12, परळी-1, पाटोदा-8, शिरुर-10, वडवणी-16 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात असून लॉकडाऊन (lockdown) मध्ये मोठी सुट जाहिर करण्यात आली आहे. 7 जूनपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत करता येणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय.

Exit mobile version