BEED24

बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा रविवारची तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.13 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1428 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 34 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1394 जण निगेटिव्ह आले आहेत.

( Today’s Corona Update in Beed District; See what the status is. )

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-8, अंबाजोगाई-3, आष्टी-1, धारुर-4, गेवराई-4, केज-4, माजलगाव-1, परळी-5, पाटोदा-1, शिरुर-1, वडवणी-2 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज किंचित वाढ झाली आहे. आज सर्वच तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसात आजची संख्या सर्वाधिक आहे. गुरुवारी 29, शुक्रवारी 27 तर शनिवारी 21 बाधित आढळले होते.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या शनिवारच्या नोंदीनूसार 48 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या 48 तासात दोन मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2863 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 247 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 2.32 टक्के, रिकव्हरी रेट 97.62 तर डेथ रेट 2.64 आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी दिवसभरात 4,359 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 237 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहे. तर 12,986 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आले.

आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 78,39,447 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 लाख 39 हजार 854 जण बरे झाले आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट 97.54 टक्के झाला आहे.

सध्या राज्यात 52,238 अक्टीव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यात आज 32 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. आजवर 1 लाख 43 हजार 387 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. तर राज्याचा मृत्युदर 1.82 टक्के आहे. आता पर्यंत 7 कोटी 63 लाख 02 हजार 782 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. राज्यात सध्या 2,387 जण संस्थात्मक क्वारंटाईन तर 3,13,457 जण होम क्वारंटाईन आहे.

 

Exit mobile version