BEED24

बीड जिल्हा कोरोना अपडेट; पहा शुक्रवारची तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.26 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 683 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 4 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 679 जण निगेटिव्ह आली आहेत. आज चार तालुक्यात प्रत्येकी एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-1, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज पाचच्या आत आली आहे. बुधवारी 8, गुरुवारी 9 तर आज शुक्रवारी 4 बाधित आडळली आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार गुरुवारी 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मृत्यूची एकुण संख्या 2823 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 79 आहे.

दरम्यान, राज्यात दैनंदिन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं असून राज्यात 50 रुग्ण दगावले आहेत. काल ही संख्या 41 वर होती. पण दैनंदिन रुग्णसंख्या काहीशी कमी होऊन 848 झाली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,79,396 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.68 टक्के एवढं झालं आहे.

राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,857 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 9,187 इतकी आहे, गुरुवारी 848 रुग्णांसह कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,33,105 झाली आहे.

 

Exit mobile version