बीड दि.12 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1492 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 8 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1484 जण निगेटिव्ह आहेत. आज पाच तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-1, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-2, केज-3, माजलगाव-1, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत काल मोठी घट दिसून आली. केवळ अंबाजोगाई तालुक्यात काल दोन रुग्ण होते तर आज पाच तालुक्यात 8 रुग्ण आढळले आहेत. शनिवारी (दि.11) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 होती. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2835 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 73 झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात राज्यात 807 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 869 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 6 हजार 452 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 43 हजार 179 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 91 हजार 805 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.72 टक्के एवढा झाला आहे.