बीड दि.8 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1737 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 26 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1711 जण निगेटिव्ह आहेत. आज 9 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-10, अंबाजोगाई-4, आष्टी-1, धारुर-2, गेवराई-1, केज-2, माजलगाव-1, परळी-3, पाटोदा-0, शिरुर-2, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. काल शुक्रवारी (दि.7) 16 कोरोना बाधित आढळून आले होते ती वाढून आज 26 झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2842 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 72 झाली आहे.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येने कहर केला असून तब्बल 40 हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असून जनतेमध्ये चिंतेच वातावरण आहे.राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लावले असून देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतच चालली आहे.
महाराष्ट्रात काल दिवसभरात 40,925 नवीन कोरोना रुग्ण सापडले. राज्यात 14,256 बरे झाले असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 1,41,492 एवढी असून ओमीक्रोन रुग्णसंख्या 876 वर पोहोचली आहे.