बीड दि.16 जानेवारी – जिल्ह्यात आज रविवारी तब्बल सव्वाशे कोरोना बाधित आढळले आहेत. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1814 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 125 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1689 जण निगेटिव्ह आहेत. आज सर्वच तालुक्यात रुग्ण आढळले असून अंबाजोगाई, बीड व परळीत मोठ्या संख्येत बाधित आढळल्याने टेंशन वाढले आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-23, अंबाजोगाई-24, आष्टी-9, धारुर-3, गेवराई-8, केज-3, माजलगाव-10, परळी-26, पाटोदा-10, शिरुर-5, वडवणी-4 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज तिसऱ्या दिवशी धडकी भरवणारी वाढ दिसून आली आहे. अंबाजोगाई, बीड व परळीत बाधितांची संख्या अधिक आहे. आज तब्बल सव्वाशे रुग्ण आढळले.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार काल 18 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एका मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2843 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 298 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 4.70 टक्के झाला आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी 43,211 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर 19 मृत्यूची नोंद झाली. मुंबईत शुक्रवारी 11,317 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला. यापैकी 84 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले होते. शुक्रवार संध्याकाळपर्यंत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 84,352 होती.
दरम्यान राज्यात कोरोना सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 2,61,658 वर पोहचली आहे. आज नोंदवल्या गेलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 238 होती, ज्यामुळे राज्यात एकून ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1605 झाली आहे.