बीड दि.17 जानेवारी – जिल्ह्यात आज रविवारी आढळलेल्या सव्वाशे बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज केवळ 1056 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 129 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 927 जण निगेटिव्ह आहेत. आज पुन्हा सर्वच तालुक्यात रुग्ण आढळले असून बीड तालुक्यात मोठ्या संख्येत बाधित आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-59, अंबाजोगाई-20, आष्टी-3, धारुर-2, गेवराई-2, केज-9, माजलगाव-2, परळी-7, पाटोदा-12, शिरुर-7, वडवणी-6 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ दिसून आली आहे. आज सर्वाधिक बाधित बीड तालुक्यात आढळून आले आहेत. आज जिल्ह्यात 129 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या बीड तालुक्यात 59 आहेत. विशेष म्हणजे संशयिताच्या तपासणी कमी आहे.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या रविवारच्या नोंदीनूसार 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एका मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2843 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 403 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 6.89 टक्के झाला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत चढ-उतार दिसून येत असून आज 41 हजार 327 नव्या रुग्णांची नोंद ( New corona cases in Maharashtra ) झाली आहे. तर 40 हजार रुपये बरे झाले आहेत.
रविवारी 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन लाख 65 हजार रुग्ण सक्रिय (Active Patient) असल्याने चिंता वाढली आहे. ओ मायक्रोनचे देखील रुग्ण घटले असून आज 8 रुग्ण ( Omicron Patient In Maharashtra ) सापडले आहेत. सर्वाधिक 5 रुग्ण पुण्यात आढळून आल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.