बीड दि.19 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2277 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 205 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2072 जण निगेटिव्ह आहेत. आज पुन्हा 11 तालुक्यात रुग्ण आढळले असून आजही एकट्या बीड तालुक्यात मोठ्या संख्येत बाधित आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-77, अंबाजोगाई-38, आष्टी-4, धारुर-11, गेवराई-10, केज-10, माजलगाव-13, परळी-22, पाटोदा-8, शिरुर-8, वडवणी-4 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज सलग पाचव्या दिवशी मोठी वाढ दिसून आली आहे. आज सर्वाधिक बाधित बीड तालुक्यात आढळून आले आहेत. आज जिल्ह्यात 205 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या बीड तालुक्यात 77 आहेत.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या मंगळवारच्या नोंदीनूसार 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात दोन मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2845 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 541 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 8.73 टक्के झाला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 39 हजार 207 नव्या रुग्णांची भर झाली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 38, 824 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1001 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.