BEED24

शनिवारी बीड जिल्हा तीनशे पार… केज, वडवणी, पाटोदातही रुग्ण वाढ, पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.22 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2414 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 307 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2107 जण निगेटिव्ह आहेत. आजही सर्वच तालुक्यात रुग्ण आढळले असून आज अंबाजोगाइमध्ये सर्वाधिक बाधित आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-46, अंबाजोगाई-81, आष्टी-16, धारुर-8, गेवराई-19, केज-20, माजलगाव-32, परळी-41, पाटोदा-19, शिरुर-8, वडवणी-17 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत चालू आठवड्यात मोठी वाढ दिसून आली आहे. आज सर्वाधिक बाधित अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले आहेत. बुधवारी जिल्ह्यात 205, गुरुवारी 239, शुक्रवारी 295 तर आज शनिवारी 307 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या अंबाजोगाई तालुक्यात 81 तर बीड 46 व परळी तालुक्यात 41 रुग्ण आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या शुक्रवारच्या नोंदीनूसार 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2845 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1129 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट वाढून 12.39 टक्के झाला आहे.

दरम्यान, राज्यात कोविड बाधित रुग्णांमध्ये वाढ सुरूच असून आज 48,270 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 74,20,027 झाली आहे. आज पुन्हा एकदा मुंबई, नवी मुंबई, पुणे, पुणे मनपा, सातारा मनपा परिसरात अधिक रुग्ण आढळले. राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona new patients) मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे दिसते. आज राज्यात 52 रुग्णांचा (corona deaths) मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,42,023 इतका झाला आहे.

शुक्रवारी 42,391 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 70,09,823 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 94.47 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 23,87,593 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 2,64,388 इतकी झाली आहे.

 

Exit mobile version