BEED24

बीड जिल्ह्यात आज बाधितांची संख्या दोनशेच्या आत… पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.27 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1165 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 165 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1000 जण निगेटिव्ह आहेत. आज वडवणी वगळता 10 तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. संशयितांच्या तपासणी संख्या मात्र कमी झाली आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-40, अंबाजोगाई-47, आष्टी-21, धारुर-2, गेवराई-6, केज-8, माजलगाव-7, परळी-19, पाटोदा-8, शिरुर-7, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्खा कालपेक्षा आज कमी झाली आहे. आज अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 47 रुग्ण तर बीड तालुक्यात 40 रुग्ण आढळले आहेत. माजलगाव तालुक्यात वाढलेली संख्या आटोक्यात आली आहे.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या मंगळवारच्या नोंदीनूसार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2847 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1906 झाली आहे. एका आठवड्यात जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट काल कमी होवून 12.44 झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३५ हजार ७५६ नव्या कोरोना रुग्णांची आणि ७९ मृत्यूची नोंद झाली. राज्यातले ३९ हजार ८५७ कोरोना रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २८५८ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी १५३४ बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ७ कोटी ३८ लाख ६७ हजार ३८५ कोरोना चाचण्यांपैकी ७६ लाख ५ हजार १८१ पॉझिटिव्ह आल्या.

राज्यात आढळलेल्या ७६ लाख ५ हजार १८१ कोरोना रुग्णांपैकी ७१ लाख ६० हजार २९३ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४२ हजार ३१६ मृत्यू झाले तसेच ३८३९ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला.

राज्यात कोरोना संकटामुळे १५ लाख ४७ हजार ६४३ होम क्वारंटाइन तर ३२९८ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा मृत्यूदर १.८७ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १०.३० टक्के आणि रिकव्हरी रेट ९४.१५ टक्के आहे.

 

Exit mobile version