BEED24

बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा काय आहे आजची तालुकानिहाय स्थिती.

बीड दि.3 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2014 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 149 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1865 जण निगेटिव्ह आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-34, अंबाजोगाई-20, आष्टी-25, धारुर-8, गेवराई-9, केज-7, माजलगाव-16, परळी-10, पाटोदा-11, शिरुर-5, वडवणी-4 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत चढ उतार सुरुच आहे. कालपेक्षा आज बाधितांचा आकडा वाढला आहे. आज बीड तालुक्यात 34 व आष्टी तालुक्यात 25 सर्वाधिक तर माजलगाव तालुक्यात 16 रुग्ण आढळले आहेत. धारुर व केज तालुक्यात बाधितांची संख्या वाढली आहे.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या बुधवारच्या नोंदीनूसार बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बुधवारी 225 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू संख्येत 2 ने वाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2854 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1023 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 6.10 टक्के, रिकव्हरी रेट 96.40 तर डेथ रेट 2.65 आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात बुधवारी दिवसभरात 18 हजार 67 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 36 हजार 281 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. तर 79 जणांचा मृत्यू झाला आहे.

काल राज्यात 113 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय. सर्वाधिक 42 रुग्णांची नोंद नागपूरमध्ये झालीय. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी 18 रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबईत 13 पुणे शहरात 6 अमरावती मध्ये 4 आणि साताऱ्यात 3 रुग्ण आढळलेत. आतापर्यंत राज्यात 3334 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.1701 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

 

Exit mobile version