बीड दि.11 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज गुरुवारी 1138 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 22 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1116 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात मृत्यूचे सत्र रविवारीही सुरुच होते. रविवारी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-8, अंबाजोगाई-0, आष्टी-5, धारुर-1, गेवराई-0, केज-1, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-3, वडवणी-1 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत चढ उतार दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (दि.6) 4, गुरुवारी (दि.7) 2, शुक्रवारी (दि.8) 2, शनिवारी (दि.9) 2 तर रविवारी (दि.10) रोजी 1 कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या पाच दिवसात तब्बल 11 कोरोना बळींची नोंद झाली. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या आता 2785 झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर राज्यात सर्वाधिक 2.70 इतका आहे.
दरम्यान, राज्यात 2 हजार 294 नवीन कोरोना बाधित आढळले असून, 1 हजार 823 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, 28 कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 64,01,287 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.32 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,77,872 झाली आहे. तर, राज्यात आपर्यंत 139542 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.